Pune Pimpri Chinchwad Crime News | तरूणीशी शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार, नाशिकमधील तरुणावर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणीशी शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून लग्नास नकार देणाऱ्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गंगापूर रोड नाशिक आणि पुण्यातील हिंजवडी परिसरात ऑगस्ट 2017 ते जानेवारी 2023 दरम्यान घडला आहे. आरोपी आणि फिर्यादी दोघेही नाशिक शहरातील आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

अनिकेत रामदास भदाने (वय-26 रा. नाशिक) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नाशिक येथे राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने गुरुवारी (दि.18) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दोघेही नाशिकचे आहेत. आरोपीने पीडित तरुणीसोबत ओळख करुन मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले.

आरोपी अनिकेत याने पीडित तरुणीला आपण लवकरच घरच्यांना सांगून लग्न करणार असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर तरुणी सोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नास नकार दिला. तसेच तिला शिवागाळ करुन हाताने मारहाण करुन तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक मंजुशा मुळुक यांनी सांगितले की, दोघेही नाशिकचे रहिवासी आहेत. पीडित तरुणी हिंजवडी परिसरात नोकरी करते. आरोपीने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. गुन्हा नाशिक येथे घडला असून पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करुन हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग केला जाणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

माथाडीच्या नावे खंडणी मागणारा अटकेत, लोणी काळभोर परिसरातील घटना