Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीला धक्का का दिला विचारणा केल्याने टोळक्याने खाली पाडून केली मारहाण

Pune Pimpri Chinchwad Crime News | For asking why the bike was pushed, the gang knocked him down and beat him up

तरुणाला रक्ताची लघवी, मित्रालाही मारहाण करणारे चौघे जेरबंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | दुचाकीला धक्का दिल्याने विचारणा केल्यावरुन टोळक्याने तरुणाला व त्याच्या मित्राला खाली पाडून बेदम मारहाण (Marhan) केली. त्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन तरुणाला रक्ताची लघवी झाली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. (Attack On Youth)

ओम संजय दळवी (वय २२), ओंकार शरद आवंदे (वय २४), गणेश गोरख कुंभार (वय २६), प्रितेश पांडुरंग जाधव (वय २१, सर्व रा. सिद्धीविनायक नगरी, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या २ साथीदारांवरही खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत चंद्रकांत दत्ता बुटे (वय ३८, रा. राधेकृष्ण निवास, आकुर्डी गावठाण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार निगडी येथील ट्रान्सपोर्टनगरमधील स्वागत हॉटेल येथे ८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावयायिक आहेत. आरोपींनी फिर्यादी यांच्या दुचाकीला धक्का दिला. तेव्हा फिर्यादी यांनी दुचाकीला धक्का का दिला अशी विचारणा केली. तेव्हा ओम व ओंकार यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. त्याचे इतर मित्र गणेश, प्रितेश व इतरांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करुन “आज चंद्याला जिवंत सोडायचा नाही, लय माज आलाय” असे म्हणून फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने हाताने लाथाबुक्क्यांनी डोक्याला, डोळ्याला, दोन्ही बरगड्यांवर खाली रोडवर पाडून पोटावर लाथा मारल्या. त्यामुळे फिर्यादी यांना अंर्तगत रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची लघवी झाली. फिर्यादी यांचा मित्र आशिष यालाही त्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक शिर्के तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case | Satish Wagh was killed by paying a supari of 5 lakhs; Out of the five accused, 3 accused were detained by the police; Neighbor committed act due to personal dispute (Video)

Satish Wagh Murder Case | सतीश वाघ यांची हत्या 5 लाखांची सुपारी देऊन; पाच आरोपींपैकी 3 आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात; शेजारी राहणार्‍याने वैयक्तिक वादातून केले कृत्य (Video)