Pune Pimpri Chinchwad Crime News | घरफोडी, दुचाकी चोरणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांकडून अटक, साडे पाच लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | हडपसर परिसरात घरफोडी (House Burglary) आणि दुचाकी चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, डायमंड रिंग, रोख रक्कम आणि दोन दुचाकीचा समावेश आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

ऋषिकेश संतोष मोटे (वय 20 रा.खुटवड चौक, फुरसुंगी), प्रदीप भागवत पोळ (वय 20 रा.चंदवडी कॅनॉल जवळ फुरसुंगी) आणि कृष्णा भिमा पवळ (वय 19, कामठे आळी, रा. फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

फुरसुंगी येथील खुटवड चौकातील एका सोसायटीमधील बंद फ्लॅटमध्ये घरफोडी झाली होती. चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, डायमंड रिंग, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण तीन लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत ओंकार विलास जगताप यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भादंवि कलम 457, 380 प्रमाणे घरफोडी आणि चोरीच्या गुन्हाची नोंद करून घेतली होती.

पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान हा गुन्हा तिघांनी केल्याचे निष्पन्न झाले.

तपास पथकाने आरोपींचा शोध घेऊन तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यात चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला. अधिक तपासात आरोपींनी वाहन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून 50 हजार रुपये किमतीची पॅशन प्रो तसेच दीड लाख रुपये किमतीची बुलेट अशा दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईत हडपसर पोलिसांनी 5 लाख 40 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदरील कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा,
पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक
रवींद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले यांच्या सुचनेप्रमाणे
तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, ज्योतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव आणि अमित साखरे यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी : मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने सुरक्षा रक्षकाला चाकूने भोसकले

MP Sanjay Raut | ईव्हीएममध्ये भाजपाने निश्चितच घोटाळा केलाय, खासदार संजय राऊत यांचा आरोप

Rajya Sabha Election 2024 | निवडणुकांचं बिगूल वाजलं, महाराष्ट्रासह १५ राज्यांत राज्यसभेची निवडणूक जाहीर, ‘या’ तारखेला मतदान

चंदननगर पोलिसांकडून दुचाकी चोरणार्‍याला अटक, 7 वाहने जप्त

पुणे : इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याच्या बहाण्याने 19 लाखांची फसवणूक

Nashik Crime News | तीन सराईत आरोपींना उपनगर पोलिसांकडून अटक, दोन पिस्टल तीन काडतुसे जप्त

पुणे : जुन्या भांडणाच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहण, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

फसवणूक प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध आणखी एक गुन्हा