Pune Pimpri Chinchwad Crime News | सीएम ऑफिसमधील अधिकारी असल्याचे सांगत शैक्षणिक संस्थाचालक, पालकांची फसवणूक; एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मुख्यमंत्री कार्यालयातून (CMO Maharashtra) अधिकारी बोलत असल्याचे सांगुन शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थाचालकांना कॉल करून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन देण्याच्या बहाण्याने अनेक पालकांकडून पैसे उकळणार्‍या एकाला पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली आहे (Cheating Case). राहुल राजेंद्र पलांडे Rahul Rajendra Palande (31, रा. दर्शननगर, केशवनगर, चिंचवड – Keshav Nagar Chinchwad) असे अटक केलेल्याचे नाव आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातील नितीन उत्तम पानसरे (46, रा. खारघर, नवी मुंबई) यांनी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये (Hinjawadi Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी राहुल पलांडेने मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून अनेकांचा विश्वास संपादित केला होता. तो पालकांना विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवुन देतो असे सांगायचा. त्याने मोबाईलच्या ट्रू कॉलरवर आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा बनावट लोगो ठेवला होता.

आरोपी राहुल पलांडेने डी.वाय. पाटील महाविद्यालय, सिम्बायोसिस कॉलेजमध्ये 4 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत.
दोन-तीन दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरातील एका खासगी कार्यक्रमाला आले होते.
त्यावेळी संस्थेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍यांची भेट घेवून घडलेली घटना सांगितली.
त्यानंतर सीएम ऑफिसमधून कोणाला शिफारसपत्र देण्यात आले आहे काय याची खातरजमा करण्यात आली.
त्यामध्ये पलांडेने बनावट पत्र (Fake Letter Of CMO) तयार करून भलताच उद्योग केल्याचे समोर आले.
त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

Web Title :   Pune Pimpri Chinchwad Crime News | Heads of educational institutions, claiming to be officials from the CM’s office, defrauding parents; One arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी? शिंदे गटाच्या खासदाराचा खळबळजनक आरोप; म्हणाले- ‘शिंदे गटाच्या खासदारांना भाजपकडून सापत्न…’

Pune Metro Structural Audit | पुणे मेट्रो स्थानके आहेत पूर्णपणे सुरक्षित; सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचा अहवाल

Deepak Kesarkar | मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? दीपक केसरकर यांनी स्पष्टचं सांगितले