Pune Pimpri Chinchwad Crime News | मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन विनयभंग, बालाजीनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन तिच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. तसेच तिच्या घरच्यांना बघुन घेण्याची धमकी दिली. हा प्रकार बालाजीनगर (Balajinagar Pune) येथे घडला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन सहकारनगर पोलिसांनी (Pune Police) एकावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत बालाजी नगर परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन आशिष उर्फ पंप्या (रा. बालाजीनगर) याच्यावर आयपीसी 354, 323, 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्य़ादी यांच्या तोंड ओळखीचा आहे.
आरोपीने रात्री साडे बाराच्या सुमारास तरुणीच्या घरी जाऊन दरवाजा वाजवला.
तरुणीने घराचा दरवाजा उघडताच आरोपीने फिर्यादी यांचा हात पकडला. तसेच ‘तु मला आवडते आणि आपण फिजीकल रिलेशनशिप मध्ये राहु’ असे म्हणत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तरुणीने आरडाओरडा केला असता आरोपी तेथून पळून गेला.

यानंतर पीडित तरुणी कामावरुन घरी जात असताना ‘तु माझ्या सोबत रिलेशन मध्ये राहणार आहे की नाही’ अशी
विचारणा केली. त्यावेळी तरुणीने रिलेशनमध्ये राहण्यास नकार दिला.
याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी व तिच्या घरच्यांना बघुन घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोठरे (PSI Pothre) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्ववैमनस्यातून येरवडा कारागृहात कैद्याचा खून, प्रचंड खळबळ

Bhima Koregaon Shaurya Din | विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिली सविस्तर माहिती

IPS Ritesh Kumar | पुण्यातील गुन्हेगारी नियंत्रणात, मुंबई पेक्षा जास्त पुण्यात प्रतिबंधात्मक कारवाई – पोलीस आयुक्त रितेश कुमार (Video)

Pune PMC News | नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर केबलसाठी विनापरवाना ‘खोदाई’

Manoj Jarange Patil On CM Eknath Shinde | मनोज जरांगे यांची पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका, ”आता आम्हाला त्यांच्यावर विश्वास…”