Pune Pimpri Chinchwad Crime News | घर मालकाकडून भाडेकरु महिलेचा विनयभंग, धनकवडी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुण्यातील धनकवडी (Dhankawadi) परिसरात एका घर मालकाने त्याच्या इमारतीत राहणाऱ्या एका भाडेकरु महिलेचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मार्च 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत 33 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) मंगळवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. यावरुन घरमालकावर आयपीसी 354 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची धनकवडी परिसरात बिल्डिग असून फिर्यादी महिला तिच्या पतीसोबत आरोपीकडे भाड्याने राहते. मागील काही दिवसांपासून आरोपीने महिलेकडे वारंवार पाहून बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने त्याच्यासोबत बोलणे टाळले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दरम्यान, फिर्यादी तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या घरी जात होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेसोबत स्त्री मनास लज्जा
उत्पन्न होईल असे कृत्य केले. आरोपी मागील अनेक दिवसांपासून महिलेला त्रास देत आहे.
अखेर आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने सहकारनगर पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बेरड (API Berad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Breastfeeding Tips For Beginners | तुम्ही पहिल्यांदाच आई झाला आहात, तर जाणून घ्या स्तनपान करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे…

Foods For Stamina | स्टॅमिना वाढवण्यासाठी खा ‘हे’ 4 पदार्थ, कमी होईल पोट आणि कंबरेची चरबी…!

Pune Police MCOCA Action | हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरज उर्फ चुस मोहिते टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 109 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA