Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नासाठी तरुणीचे अपहरण, एकाला अटक; हिंजवडीमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | आपल्यासोबत तरुणीने लग्न करावे यासाठी एकाने धमकी देत तरुणीचे अपहरण (Kidnapping) करुन त्याच्या गावी घेऊन गेला. त्याठिकाणी तरुणीला डांबून ठेवून तिच्याकडे लग्नासाठी (Marriage) जबरदस्ती केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (PCPC Police) एकाला अटक केली आहे. हा प्रकार 21 डिसेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास इन्फोसिस प्रा. लि. कंपनी (Infosys Pvt. Ltd.) जवळ घडला होता. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश तुकाराम बुरुटे Nilesh Tukaram Burute (रा. शेगाव, ता. जत. जि. सांगली) याच्यावर 342, 366 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी मुलीला ‘तु माझ्याशी लग्न करण्यासाठी माझ्या बरोबर चल,
तु नाही आलीस तर तुझे फोटो व्हायरल करेन, तुझ्या घरच्यांना सांगेन’ अशी धमकी दिली.
त्यानंतर मुलीने त्याला समजावून सांगितले. मात्र आरोपीने तिच्याकडे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली.
त्यानंतर निलेश याने त्याच्या चारचाकी गाडीतून मुलीला जबरदस्तीने त्याच्या शेगाव या मुळ गावी घेऊन गेला.
त्याठिकाणी मुलीला घराच्या खोलीत डांबून ठेवले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके (PSI Tukaram Khadke) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | ”टप्प्याटप्प्याने अजित पवारांची ताकद कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न, आता…”, रोहित पवारांचे वक्तव्य

Sharad Pawar | शरद पवारांनी परखड शब्दात अजित पवारांना सुनावले, ”माझे बंड यांच्यासारखे…”

Pune Pimpri Chinchwad Crime News | प्रियकराचा लग्नास नकार, प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या; तळेगाव दाभाडे येथील घटना

Ashish Shelar | आशिष शेलारांचा शिवसेनेवर पलटवार, ”गांजा, चिलीम ओढून अग्रलेख लिहिणारे, भोंदूगिरी करून…”

Pune Police-Tarang 2023 | तरंग-2023 : पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा

फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 11 लाखांची फसवणूक, चिंचवड गावातील प्रकार