Pune Pimpri Chinchwad Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोंढवा पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर एकाला अटक केली आहे. आरोपींकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी (दि.21) बोपदेव घाटातील टेबल पॉईंट जवळ केली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पोलीस अंमलदार लक्ष्मण तुकाराम होळकर (वय-39) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अनंत अनिल खोले याच्यासह 17 वर्षीय दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी 399, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अनंत खोले याला अटक केली आहे.

बोपदेव घाटातील टेबल पॉईंट जवळ तीन तरुण प्राणघातक हत्यारे घेऊन थांबले आहेत. ते घाटातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने टेबल पॉईंट जवळ सापळा रचून दोन अल्पवयीन मुलांसह आरोपी खोले याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून लाल मिरची पावडर, लोखंडी कोयता व प्राणघात शस्त्र जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोबाईल चोरी करुन विक्री करणाऱ्या उच्च शिक्षीत आरोपीला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, 17 मोबाईल जप्त