Pune Pimpri Chinchwad Crime News | कामगार नेते यशवंत भोसलेंना 16 लाखांचा गंडा, राष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या खजिनदाराला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या (National Labor Front Organization) खजिनदाराने बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने 16 लाख 8 हजार रुपये ट्रान्स्फर करुन संघटनेची आणि कामगार नेते यशवंत भोसले (Labor leader Yashwant Bhosale) यांची फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी संघटनेच्या खजिनदाराला (Treasurer) पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरीतील संत तुकाराम नगर येथील राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेच्या कार्यालयात सप्टेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2023 या कालवधित फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

हेमंत विलास माने (वय-25 रा. मु.पो. काशीळ, ता.जि. सातारा) याच्यावर आयपीसी 408, 420 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. याबाबत कामगार नेते यशवंत आनंदराव भोसले (वय-60 रा. स्वप्ननगरी, उद्यम नगरी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार नेते यशवंत भोसले हे राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष आहेत.
या संघटनेचे पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे कार्य़ालय आहे. कार्यालयात हेमंत माने हा संघटनेचा खजिनदार
म्हणून मानधन तत्वावर काम करत होता. संघटनेचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) खाते आहे.
या खात्यातून खजिनदार हेमंत माने याने अप्रामाणिकपणे ऑनलाईन पद्धतीने 16 लाख 8 हजार 19 रुपये परस्पर
स्वत:च्या खात्यावर व इतर व्यक्तींच्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले. संघटनेचे अध्यक्ष म्हणून फिर्य़ादी यशवंत भोसले
व राष्ट्रीय श्रमिक संघटनेतील पदाधिकारी व सदस्य यांचा विश्वासघात करुन फसवणूक केली,
असे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad- Devgad Beach-Four Girls Drowned-Sindhudurg Crime News | दुर्देवी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्र किनार्‍यावर पुण्यातील 5 मुले बुडाली; 4 मुलींचा समावेश

घरात घुसून तलवारीने वार, आकुर्डी परिसरातील घटना; दोघांना अटक

Lingayat Community News | होय, आम्ही बसव तत्व स्वीकारलयं ! लिंगायत युवा पिढीची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल

Talwade Fire Case | ‘स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा, एकाला अटक

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या 52 वर्षीय चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक, चार दुचाकी जप्त