Pune Pimpri Chinchwad Crime News | मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, चाकण परिसरातील घटना

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मनोरुग्ण (Psychopath) मुलाने वडिलांसोबत वाद घालून त्यांच्या डोक्यात जड वस्तू मारुन गंभीर जखमी केले. यामध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्याने वडिलांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चाकण पोलिसांनी मनोरुग्ण मुलावर खुनाचा (Murder In Pune) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सकाळी पावणे बाराच्या सुमारास दौंडकरवाडी येथे घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

खंडू लांडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा बाबाजी खंडू लांडे (वय-35 रा. दौंडकरवाडी, शेलपिंपळगाव ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नितीन खंडू लांडे (वय-32 रा. दौंडकरवाडी, ता. खेड) याच्यावर आयपीसी 302, 307, 326, 323 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मनोरुग्ण असल्याने पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचा भाऊ नितीन हा मनोरुग्ण आहे.
गुरुवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास भाऊ नितीन आणि वडील खंडू यांच्यात घरासमोर भांडण झाले.
नितीन याने वडिलांच्या डोक्यात जड वस्तूने मारुन गंभीर जखमी केले. याबबत चुलत भाऊ संतोष लांडे याने फिर्यादी यांना माहिती दिली.

तसेच जास्त रक्तस्त्राव होत असल्याने शेलपिंपळगाव येथील हॉस्पिल मध्ये घेऊन जात असल्याचे सांगितले.
दरम्यान बाबाजी शिंदे हे देखील हॉस्पिटलमध्ये पोहचले. त्यावेळी डॉक्टरांनी वडिलांना चाकण येथील युनिकेअर
हॉस्पिटल (Unicare Hospital) घेऊन जाण्यास सांगितले. फिर्य़ादी यांनी वडिलांना चाकण येथील हॉस्पिटलमध्ये
उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना रात्री आठच्या सुमारास फिर्यादी
यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डेरे (PSI Dere) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मंत्रीच कायदा, सुव्यवस्था बिघडवतायत, भुजबळ-राणेंना सरकारचे पाठबळ, जरांगेंनी व्यक्त केला संशय

Pune Water Supply | पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये कमी पाणीसाठा

Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

ACB Trap News | न्यायालयाच्या आदेशावरुन जमीन नावावर करण्यासाठी लाचेची मागणी, रक्कम स्वीकारताना तलाठी व खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मुलाकडून वयोवृद्ध आई-वडिलांना मारहाण, बोपोडी परिसरातील घटना; मुलाला अटक