Pune Pimpri Chinchwad Crime News | जीएसटीची रक्कम न भरता पावणे तीन कोटींची फसवणूक, एरंडवणे परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जीएसटी आणि वीज बिलाची रक्कम तिऱ्हाईत व्यक्तीला ऑनलाईन ट्रान्सफर करुन कंपनीची 2 कोटी 75 लाख 84 हजार 156 रुपयांचा अपहार (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार एरंडवणे येथील इलेक्ट्रोनिका फायनान्स लि. या कंपनीत (Electronica Finance Ltd. Company) मे 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महेश पुरुषोत्तम अगरवाल (वय-47 रा. डि.पी. रोड, कोथरुड) यांनी गुरुवारी (दि.18) डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्य़ाद दिली आहे. याप्रकरणी रोहित एकनाथ बचुटे याच्यावर आयपीसी 408 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची एरंवडणे येथे इलेक्ट्रोनिका फायनान्स नावाची कंपनी आहे. या कंपनी आरोप रोहित बचुटे काम करतो.

आरोपी रोहित बचुटे याच्यावर कंपनीच्या व्यवहारांची जीएसटी भरण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आरोपीने कंपनीचा विश्वासघात केला. कंपनीचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या एफसी रोड शाखेत सीसी खाते आहे. या खात्यातून आरोपीने तिऱ्हाईत व्यक्तीच्या नावाने 2 कोटी 75 लाख 84 हजार 156 रुपये जीएसटी व विज बिल ऑनलाईन ट्रान्सफर करुन पैशांचा अपहार केला. तसेच कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांच्या कॉम्प्युटरमधून काही व्यवहार करुन कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : नरबळी द्यावा लागेल, अन्यथा मुलगा व पतीचा मृत्यू होऊन घराचा नायनाट होईल, 35 लाख उकळणाऱ्या मांत्रिकासह पाच जणांवर FIR