Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा सपासप वार करुन खून, चाकण परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन चार जणांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरात (PCPC Police) घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.16) दुपारी साडे चार ते पाच या दरम्यान नाणेकरवाडी येथील कुशल स्वर्णाली साईटच्या कच्चा रोडजवळ घडली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

आकाश बापु बनसोडे (वय-25 रा.जंबुकरवस्ती, खराबवाडी, ता. खेड) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रथमेश उर्फ प्रशांत बाळु फड, सम्यक दिलीप गणवीर, अभिराज मारुती कांबळे (सर्व रा. जंबुरकरवस्ती, नाणेकरवाडी, चाकण) व एका अल्पवयीन मुलावर आयपीसी 302, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृत आकाश याचा भाऊ सागर बापु बनसोडे (वय-21) याने चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आकाश बनसोडे हा चालक आहे. त्याने क्रिकेट खेळत असताना आरोपींना शिवीगाळ केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शिवीगाळ केल्याच्या रागातून आकाश यांच्यासोबत वाद घातला. आकाश याला कुशल स्वर्णाली साइटच्या (Kushal Swarnali Site) कच्चा रस्त्याजवळ नेऊन प्रशांत फड व सम्यक गणवीर यांनी कोयत्याने वार केले. तर कांबळे व अल्पवयीन मुलाने आकाशच्या डोक्यावर, चेहऱ्यावर लाकडी दांडक्याने वार केले.

आकाश जीव वाचवण्यासाठी पळाला. तो एका घरासमोर जाऊन पडला.
त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर पुन्हा कोयत्याने व लाकडी दांडक्याने सपासप वार केले.
यामध्ये गंभीर जखमी होऊन फिर्य़ादी यांचा भाऊ आकाश याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवणाऱ्या शुभम भोसले टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 102 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

सिगारेटचे पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार, एकजण ताब्यात; वडगाव शेरी परिसरातील घटना

मुल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अश्लील चाळे, वाघोली परिसरातील घटना