Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : चारचाकी गाडी नावावर करून मागितली, पिस्तुलाचा धाक दाखवत तरुणाला मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | वॅगनार गाडी नावावर करुन दे असे म्हटल्याचा राग आल्याने दोघांनी तरुणाला बोलावून घेत पिस्तुल सारख्या हत्यार दाखवून मारहाण केली. तसेच पोलीस स्टेशनला गेला तर गोळ्या घालण्याची धमकी दिली. हा प्रकार 11 मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास आळंदी येथील वडगाव रोडवर घडला आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी (Alandi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

आशिष साहेबराव जाधव (वय 23, रा. चिंबळी, ता खेड मुळ रा. भोगेवाडी ता. माढा जि. सोलापूर) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज हनुमंत गवळी (रा निगडी), ओमकार शशिकांत ढावरे (रा. यमुनानागर, निगडी) यांच्या विरोधात आयपीसी 323, 506(2), 34 नुसार गुन्हा दाखल करून सुरज गवळी याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरोपींकडे वॅगनार गाडी नावावर करुन मागत होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. आरोपींनी फिर्यादी आशिष यांना वडगाव रोडला बोलावून घेतले. आशिष तिथे गेले असता आशिष हे त्यांच्याकडील कार नावावर करून मागत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना ‘तुला लय मस्ती आली आहे का? असे बोलून सुरज याने पिस्तुला सारखे हत्यार दाखवून धमकावले. तसेच तू जर पोलीस ठाण्यात गेलास तर तुला गोळ्या घालून तुझा कायमचा पत्ता कट करेल’ अशी धमकी देत पिस्तुल सदृश हत्याराचा धाक दाखवत मारहाण केली. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

पोलीस ठाण्याजवळ तरुणाला मारहाण

पिंपरी : देहूरोड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेंट्रल चौकाजवळ दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरुणाला अडवून बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी योगेश राजु बनपट्टे (वय-25 रा. खराळवाडी, पिंपरी), रोहीत जाधव (वय-24 रा. पिंपळे सौदागर) यांच्यावर 324, 341, 323, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कार्तिक श्रीनिवास शिंगाडे (वय-23 रा.साईनगर, मामुर्डी, देहुरोड) याने फिर्याद दिली आहे. आरोपींनी जुन्या वादातून फिर्यादी यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तर त्याच्या साथीदाराकडे कोयता होता. दोघांनी मारहाण करुन पळून गेले. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP Chandrakant Patil On Uddhav Thackeray Shivsena | ठाकरे- भाजपाचं मनोमिलन?; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने तर्कवितर्कांना उधाण

Special Session Of Parliament | संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? सभापती कोण?; जाणून घ्या

Mundhwa Pune Crime News | खुनातील आरोपी एका तासात गजाआड, मुंढवा पोलिसांची कामगिरी

Pune ACB Trap Case | पुणे : लाच घेताना वासुली गावचा तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chandrakant Patil On Vinod Tawade | ‘विनोद तावडे मोठे होतील, त्याचा आम्हाला आनंदच आहे’; चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य