Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळीचा दहशतवाद विरोधी पथकाकडून पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन शासनाची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड (PCPC Police) दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-Terrorist Squad) पर्दाफाश करुन महिलेसह चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.6) पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे करण्यात आली. आरोपींनी मागील तीन ते चार वर्षात अशा प्रकारे शासनाची फसवणूक (Cheating) केल्याचे तपासात समोर आले आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत विशेष शाखेचे ( Special Branch) श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शामवीर नामदेव गायकवाड PSI Shamveer Namdev Gaikwad (वय-55) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शिवराज प्रकाश चांभारे कांबळे (वय 40), महिला (वय 36), धोंडीबा प्रकाश शेवाळकर (वय 24, तिघे रा. साई आनंदनगर, धावडेवस्ती, भोसरी), गणेश रामदास यंगड (वय 23, आ. आल्हाटवाडी, मोशी) यांच्यावर आयपीसी 420,465, 468,471,473,34 सह आधार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे पुणे नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) कृष्णा झेरॉक्स
व स्टेशनरी नावाचे दुकान आहे. तिथे त्यांचे अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र (Aadhaar Card Service Centre)
असल्याचे भासवले. आरोपींनी याठिकाणी मागील दोन ते तीन वर्षापासून बनावट कागदपत्रे तयार करुन नागरिकांना दिली.
विविध शासकीय कागदपत्रांमध्ये अनधिकृतपणे बदल केले. याबाबत विशेष शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाला
माहिती मिळाली. पथकाने छापा टाकून शिवराज, एक महिला व त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या दोन आरोपींना
ताब्यात घेतले. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

Pune Crime News | मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार