Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये वाद, प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहत असताना झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीला पेट्रोल टाकून पेटवून देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी प्रियकरावर जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.2) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास वाकड (Wakad) परिसरात घडला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

या प्रकरणी मुळची कर्नाटक आणि सध्या रहाटणी येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन आदम खान मलंग खान पठाण (वय-29 रा. डी मार्ट जवळ, काळेवाडी, मुळ रा. सिरसम पो. पालम जि. परभणी) याच्यावर आयपीसी 307, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात प्रेमसंबंध असून ते वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.
आरोपी फिर्यादी यांना घरात राशन व घर खर्च देत नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते.
फिर्यादी यांनी घर खर्च व राशन बाबत विचारणा केल्यावर आरोपी भांडण करत होता.
फिर्यादी यांनी रविवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास आरोपीला राशन व घर खर्चासाठी घरी बोलावून घेतले.
आदम पठाण याने घरी येताना एका बाटलीत पेट्रोल घेऊन आला.
फिर्यादी यांनी खर्चाबाबत विचारणा केली असता खान याने बॅगेतून पेट्रोलची बाटली काढली.

खान याने फिर्यादी यांना आज तुझा विषयच संपवून टाकतो असे म्हणून महिलेच्या अंगावर बाटलीतील पेट्रोल टाकले.
त्यानंतर माचीस मधून काडी ओढून महिलेला पेटवून देऊन जीवंत जाळण्याचा प्रयत्न करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीला घरात ओढून नेऊन शिवीगाळ करुन हाताने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kalyani Nagar Porsche Car Accident News | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘त्या’ रात्री दारू प्यायलो होतो, अल्पवयीन मुलाची कबुली? त्याच्या मित्रांना पोलीस करणार साक्षीदार

Shaniwar Wada Pune Crime News | पुणे : शनिवारवाड्यात बॉम्बची अफवा, पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या बीडमधील तरुणावर गुन्हा दाखल

Kondhwa Pune Crime News | पुणे : लग्न कर, नाही तर ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करेन! तरुणावर गुन्हा दाखल