Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : गाडीचा कट मारल्याने माफी मागायला सांगितले, तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पायी जाणाऱ्या पत्नीला दुचाकीने कट मारल्यानंतर गाडी चालकाला पतीने माफी मागण्यास सांगितले. याचा राग आल्याने दुचाकी चालकाने महिलेच्या पतीवर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि.29) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास संततुकाराम नगर, पिंपरी येथे घडला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police Station) एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Kill)

याप्रकरणी अमित बाळासाहेब पिसाळ (वय 34 रा.कासारवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून योगेश कांबळे (वय 25 रा. फुगेवाडी) व त्याच्या इतर तीन साथीदारांवर आयपीसी 326, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Attempt To Murder)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी व नातेवाईक रस्त्याने पायी फिरत होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला गाडीने कट मारला. याबाबात फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीला व त्यांच्या भावाला सांगितले. फिर्यादी व भावाने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला व माफी मागण्यास सांगितले. याचा राग मनात घेत आरोपीने कोयता काढून फिर्यादीला मारहाण करत जखमी केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिस ठाण्याच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

चिखली : पोलीस ठाण्याच्या पार्कींगमधून दुचाकी चोरीला (Vehicle Theft) गेल्याचा प्रकार मंगळवारी (दि.28) चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये फिर्यादी यांनी त्यांची 50 हजार रुपयांची मोपेड (एमएच 14 जीटी 0504) दुचाकी लॉक करून ठेवली असताना अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ravindra Dhangekar On Dr Ajay Taware | ‘पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या डॉ. तावरेला भरचौकात फाशी दिली पाहिजे’; धंगेकरांचे वक्तव्य

Chhagan Bhujbal On BJP | ‘काय समज द्या, समज द्या लावलंय, मी माझ्या पक्षात बोलणारच’; भुजबळांनी भाजप नेत्यांना खडसावले