Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड: पत्‍नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही ! तिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीकडून ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून

देहूगाव: Pune Pimpri Chinchwad Crime News | ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट (AanandDoh Ghat Dehugaon) परिसरात (दि.२०) सायंकाळी साडेसात ते नऊ वाजताच्या सुमारास ही खुनाची घटना घडली.

प्रतीक्षा जयदीप यादव (वय.२१) असं खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती जयदीप अर्जुन यादव ( वय २९, रा.देहूगाव, मूळ.रा.चिखलगोल,सांगली ) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी (दि २१) याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuraod Police Station) फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा आणि जयदीप यादव हे दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले. जयदीप हा खाजगी कंपनीत नोकरीला आहे. गेल्या आठवडापूर्वी ते देहूगाव येथे राहावयास आले होते. पत्नी शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेऊ देत नाही तसेच तिचे अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याचा संशय जयदीप याला होता.

दरम्यान, प्रतीक्षा आणि जयदीप हे दोघे गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला गेले.
तेथे ओढणीने गळा आवळून जयदीप याने तिचा खून केला.
तसेच गुन्हा लपविण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाइल घटनास्थळा जवळील इंद्रायणी नदीत (Indrayani River) टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) शवविच्छेदन करून प्रतीक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे तपास करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Nashik Highway Accident | ‘माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं’;
अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण

OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर थरार ! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न (Video)