Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार, दोघांवर गुन्हा

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका तरुणावर दोन जणांनी कोयत्याने वार केले. डोक्यात सपासप वार केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथील अजंठानगर (Ajantha Nagar Chinchwad) येथील अण्णाभाऊ साठे चौकात (Anna Bhau Sathe Chowk Pimpri-Chinchwad) घडला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी (Nigdi Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत अंकुश शामराव कुऱ्हाडकर (वय-21 रा. शिवनगरी, देहुरोड, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सनी सोनवणे, संतोष सोनवणे (दोघे रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 307, 506, महाराष्ट्र पोलीस कायदा, आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी व त्यांचा मित्र आजीकडे जात होते. अण्णाभाऊ साठे चौकात आरोपींनी फिर्यादी यांना अडवले. तु आमच्या भावाला का मारले, तुला जास्त माज आलाय का, तुला संपवतोच असे म्हणून संतोष याने फिर्यादी यांना पकडले. तर सनी याने अंकुश यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील कोयत्याने डोक्यात सपासप तीन वार केले. यावेळी अंकुश याचा मित्र त्याला वाचवण्यासाठी आला असता आरोपींनी त्याच्यावर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maval Pune Crime News | मावळ : जमिनीच्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खून

Attack On Nilesh Lanke Supporter | लोकसभा निवडणुकीनंतर खदखद बाहेर; पारनेरमध्ये राडा, लंकेंच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला