ADV

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : घरात घुसून कुटुंबाला मारहाण, तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणाच्या कारणावरुन घरात घुसून कुटुंबातील चौघांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण (Marhan) केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी (Dehu Raod Police) सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.10) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास देहुगावातील चव्हाण नगर (Chavan Nagar Dehugaon) भागात घडला आहे.

याबाबत रमाकांत शिवाजी तिडके (वय-36 रा. चव्हाणनगर भाग-2, देहुगाव) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तेजस चंद्रकांत कोरडे (वय-19), साईराज अभिमन्यु देशमुख (वय-20), अभय लक्ष्मण लंगडे (वय-19 रा. देहुगाव, ता. हवेली मुळ रा. मु.पो. गौर ता. कळंब) यांना अटक केली आहे. तर त्यांच्या चार ते पाच साथीदारांवर 452, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सुतारकाम करतात. आरोपी त्यांच्या घरा शेजारी राहत असून तोंड ओळखीचे आहेत. फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाले होते. याचा राग मनात धरून आरोपी इतर चार ते पाच साथीदारांना घेऊन फिर्य़ादी यांच्या घरात घुसले. तेजस कोरडे याचा काळेवाडीत राहणाऱ्या मित्राने फिर्यादी यांना हॉकीस्टीकने बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांची पत्नी, आई व मुलाला देखील हाताने व लाथाबुक्क्यांनी माराहण करुन जखमी केले. आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच अभय च्या नादाला लागला तर कुटुंबासह मारुन टाकण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS-BJP-Mahayuti | महायुतीत चौथा वाटेकरी, मनसेने महायुतीकडे ‘या’ 20 जागा मागितल्या? ; जाणून घ्या

RSS On BJP About Support Of Ajit Pawar | पुरेसे बहुमत असताना अजितदादांना सोबत का घेतलं? RSS ने भाजपाला सुनावलं

Sassoon Hospital | ससूनच्या डॉक्टरांची खाजगी मेडिकलवाल्यांशी ‘दुकानदारी’; ससून रुग्णालयाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर, कारवाई होणार? (Video)

Maha Vikas Aghadi | अखेर मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांचा अर्ज मागे