पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime News | देशी दारुच्या दुकानात दारु पित बसले असताना त्यांच्यावर वाद झाला. तेव्हा रिक्षाचालकाने चप्पलेने मारहाण केली. त्याचा राग आल्याने बगाडे याने त्याच्याकडील स्क्रु ड्रायव्हर रिक्षाचालकाच्या छातीत गळ्याजवळ खुपसून त्याचा खून केला. (Murder Of Rickshaw Driver)
अमीर मकबुल खान (वय ३४, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी दौलत मकबुल खान (वय ३१, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यशवंत आत्माराम बगाडे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार विजय बारच्या समोर कुणाल रिव्हर साईड सोसायटीच्या बाजुला रविवारी रात्री पावणे दहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा भाऊ अमीर खान हे रिक्षाचालक आहेत. ते दोघे, त्यांचे मित्र फिरोज आयुब खान व इतर एक जण असे विजय देशी दारुच्या दुकानामध्ये दारु पित बसले होते. तेथेच यशवंत बगाडे हा ही दारु पित बसला होता. दारु चढल्यानंतर त्यांच्यामध्ये बोला चालीवरुन वाद झाला. त्यावेळी अमीर खान याने बगाडे याला चप्पलने मारले. वीट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्याने यशवंत बगाडे याने त्यांच्याकडील स्क्रु ड्रायव्हर अमीर खान याच्या छातीत गळ्याजवळ मारला. स्क्रु ड्रायव्हर खोलवर गेल्याने अमीर खान याचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक करंबळकर तपास करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa