Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : नरबळी द्यावा लागेल, अन्यथा मुलगा व पतीचा मृत्यू होऊन घराचा नायनाट होईल, 35 लाख उकळणाऱ्या मांत्रिकासह पाच जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जादुटोणा (Black Magic), अघोरी विद्या करुन जन्मापासून मानसिकरित्या दुर्बल व आजारी असलेल्या मुलाला बरे करण्यासाठी आधी 35 लाख रुपये उकळले. त्यानंतर आणखी 50 लाख रुपयांची मागणी करुन नरबळी द्यावा लागेल अन्यथा घराचा नायनाट होईल, अशी भीती दाखवली. ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील चव्हाणनगर येथे घडली आहे. याप्रकरणी मांत्रिकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2016 पासून ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

चारुदत्त संजय मारणे (वय-31 रा. बिपानी वस्ती, आंबेगाव), पुनम घनश्याम कोहंडे (वय-38), निलम राहुल जाधव (वय-35 रा. कर्वेनगर, पुणे), देवीका अमित जुन्नलकर (वय-30 रा. उत्सव मंगल कार्यालयामागे, कोथरुड), संतोष मारुती येणपुरे (वय-45 रा. गणेशपुरी सोसायटी, वारजे माळवाडी) यांच्यावर आयपीसी 417, 420, 406, 120(ब), 34 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व समुळ उच्चाटन अधिनीयमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत चव्हाणनगर येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा जन्मापासून मानसिकरित्या दुर्बल आणि आजारी आहे. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांच्या मुलाची आजारपणातून मुक्तता करण्यासाठी आणि घरातील अडीअडचणी जादूटोण्याच्या साह्याने दूर करतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपींनी अघोरी विद्या करुन जादुटोणा करुन मंत्राच्या सहाय्याने भुत पिशाच्या सहाय्याने मुलाला बरे करतो असे सांगून महिलेकडून वेळोवेळी 35 लाख रुपये घेतले. मात्र काहीही न करता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.

दरम्यान, ऑक्टोबर 2023 मध्ये आरोपींनी फिर्यादी महिलेला संपर्क साधून आणखी 50 लाख रुपयांची मागणी केली. तसेच एक नरबळी द्यावा लागेल. तसे नाही केले तर तुमच्या मुलाचा व पतीचा मृत्यू होईल व तुमच्या घराचा नायनाट होईल असे बोलून फिर्यादी यांना भिती घातली. महिलेने घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर महिलेने याबाबत न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सीआरपीसी 156(3) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

कोथरुड परिसरातील सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 87 वी कारवाई