Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Police) अंतर्गत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये (Bhosari MIDC Police Station) कार्यरत असणारे पोलिस अंमलदार विशाल माने (Police Vishal Mane) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Of Policemen In Pimpri) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलामध्ये प्रंचड खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

विशाल माने यांची गुरूवारी साप्ताहिक सुट्टी होती. ते त्यांच्या काही मित्रांसह बाहेर फिरण्यासाठी गेले होते.
रात्री घरी आपल्यानंतर त्यांनी आई-वडिलांसह बातचीत केली. त्यानंतर ते झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेले
आणि गळफास घेवून आत्महत्या केली.
आवाज दिल्यानंतर देखील दरवाजा उघडत नसल्याने घरच्यांनी शेजार्‍यांना बोलावून दरवाजा तोडला. त्यावेळी विशाल माने यांनी गळफास घेतल्याचे चित्र समोर दिसले.

विशाल माने यांची पत्नी काही दिवसांपुर्वी माहेरी गेली होती.
विशाल यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि मुलं आहेत.
अचानकपणे विशाल माने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News: Policeman committed suicide by hanging himself

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

75 Rs New Currency Launch | अर्थमंत्रालाची घोषणा, बाजारात येणार ७५ रुपयांचे नवे चलन; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी करणार लाँच

Maharashtra Congress | नाना पटोलेंना पदावरुन हटवा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाची हायकमांडकडे मागणी: हायकमांड महाराष्ट्रात भाकरी फिरवणार?

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – रात्री क्रिकेट खेळणार्‍या मुलांना टोळक्याने केली मारहाण; मोटारसायकल, कारची केली तोडफोड

Pune Crime News | Food Delivery App चा अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वापर; 5 जणांना अटक, 53 लाखांचे ‘एलएसडी स्टॅम्प’ (Drugs) जप्त