Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे-पिंपरी क्राईम न्यूज : पिंपरी पोलिस स्टेशन – विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नावाने बनावट सर्टिफिकेट तयार करुन संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न

पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | शैक्षणिक संस्थेच्या विविध कामासाठी सल्लागार (Consultant) म्हणून नेमलेल्यांची अतिरिक्त पैशांची मागणी पूर्ण न केल्याने संस्थेची बदनामी करण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव (IAS Saurabh Rao), पीएमआरडीएचे (PMRDA) फायर सेफ्टी ऑफिसर यांच्या बनावट सह्या व शिक्क्यांचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत पिंपरी पोलिसांनी आशुतोष ओझा (वय ५५) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुभद्रा एज्युकेशन सोसायटीच्या (Subhadra Education Society) मुख्याधापिका निना भल्ला यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये (Pimpri Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४८/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभद्रा एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय माध्यमिक शाळेच्या इयत्या १ ते १२ वी पर्यंतच्या चिखली शाखेत ४८ तुकड्या असून शाळेला आणखी तुकड्यांची आवश्यकता असल्याने संस्थेने तुकडीवाढ करण्याबाबत मंजुरीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे तयार केली. संस्थेचे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचे Central Board of Secondary Education (सीबीएससी-CBSC) काम पाहण्याकरीता संस्थेने आशुतोष ओझा याला काम दिले आहे. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी सर्व कागदपत्रे त्याला पाठविली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दरम्यान, बनावट सही व शिक्क्यांचा वापर करुन परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संस्थेला पत्र मिळाले.
त्यानंतर संस्थेचे चौकशी समिती नेमली. त्यात संस्थेने दिलेल्या कागदपत्रात आशुतोष ओझा याने फेरफार केले.
चिखली शाखेचे बनावट फायर सर्टिफिकेट व बनावट लँड सर्टिफिकेट बनवुन संस्थेच्या चिखली शाखेच्या लँड
सर्टिफिकेटवर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बनावट सही व शिक्क्यांचा वापर केला.
फायर सर्टिफिकेटवर पीएमआरडीएच्या चीफ फायर ऑफिसर यांची बनावट सही व शिक्के यांचा वापर करुन ही बनावट कागदपत्रे केंद्रिय माध्यमिक बोर्डाचे वेबसाईटवरील सरस या पोर्टलवर अपलोड केल्याचे निष्पन्न झाले.
आशुतोष ओझा याने संस्थेच्या रहाटणी व पिंपरी शाखेची बनावट फायर सर्टिफिकेट बनवुन त्यावर पीएमआरडीए चे
चीफ फायर ऑफिसर यांची बनावट सही व शिक्के याचा वापर करुन ती सरस या पोर्टलवर अपलोड केल्याचे कमिटीच्या
तपासात निष्पन्न झाले आहे.
सल्लागार म्हणून कामासाठी संस्था देत असलेल्या कामाच्या बदल्यात त्यांना अतिरिक्त पैशांची मागणी केली होती.
आधिक आर्थिक मोबदला घेण्याच्या उद्देशाने त्याने संस्थेची बदनामी करण्यासाठी हे बनावट कागदपत्रे अपलोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune-Pimpri Crime News : Pimpri Police Station – An attempt to defame the institution by creating a fake certificate in the name of Divisional Commissioner Saurabh Rao

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Non-Creamy Layer Certificate | खुल्या, मागास प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Maharashtra Political News | अजित पवारांच्या भोवती संशयाचे ढग, चार दिवसांनी फडणवीस माध्यमांसमोर आले, मात्र…

Maharashtra Cabinet Decision | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या बैठकीतील 12 निर्णय