Pune Pimpri Chinchwad Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, वडगाव शेरी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीवर वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. मात्र, तरुणीसोबत लग्न न करता दुसऱ्या मुलीसोबत लग्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील तरुणावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2019 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वडगाव शेरी आणि गोवा येथील रिसॉर्टमध्ये घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत वडगाव शेरी परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय पीडित तरुणीने बुधवारी (दि.17) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन कृष्णा भरत जाधव (वय-32 रा. स्वामी समर्थ नगर, आडगाव शिवार, पंचवटी, नाशिक) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 377, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी नाशिक येथील एका बँकेत टेंपररी नोकरी करत होते. त्यावेळी त्यांची एकमेकांसोबत ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, पीडित तरुणीला पुण्यात नोकरी लागल्याने ती पुण्यात वडगाव शेरी परिसरात राहण्यास आली. आरोपीने फिर्यादी यांना पुण्यात भेटण्यासाठी येऊन लग्नाचे आमिष दाखवले. तसेच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर आरोपीने वारंवार पुण्यात तरुणीच्या राहत्या घरी येऊन तु मला खूप आवडते मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे आमिष दखून शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने आपल्या संबंधाबाबत कोणाला सांगितले तर तुझे तुकडे करीन अशी धमकी दिली. दरम्यान, आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. याबाबत पीडित तरुणीला समजले. फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन कृष्णा जाधव याच्या विरोधात तक्रार दाखल केली. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे करीत आहेत.