Pune Pimpri Chinchwad Crime News | कुलमुखत्यार पत्राद्वारे फ्लॅटची विक्री, पतीविरोधात गुन्हा दाखल; चिंचवड येथील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीच्या नावावर असलेल्या कुलमुखत्यार पत्राचा वापर करुन पतीने परस्पर फ्लॅटची विक्री करुन 35 लाखांची फसवणूक (Fraud) केली. याप्रकरणी पत्नीने चिंचवड पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा (PCPC Police) दाखल केला आहे. हा प्रकार 2012 ते डिसेंबर 2023 दरम्यान चिंचवड येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरेश शंकर जुनवणे Suresh Shankar Junwane (वय-51 रा. औंध पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा औंध येथील शिल्पलेखा बिल्डिंगमध्ये (Shilpelekha Building Aundh)
फ्लॅट आहे. या मिळकती साठी तयार केलेले कुलमुखत्यार पत्र फिर्यादी यांच्या नावावर आहे.
या कुलमुखत्यार पत्राचा वापर करुन आरोपी सुरेश जुनवणे याने 2012 मध्ये फिर्यादी यांना कोणतीही कल्पना न देता
परस्पर विकला. महिलेला शिल्पलेखा बिल्डिंग मधील फ्लॅट विक्री करायचा नसताना आरोपी पतीने
सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 5 चिंचवड येथे खरेदीखत करुन स्वाती सरनोत यांना विकला.
आरोपी पतीने 35 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणवरे (PSI Ranware) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणारे सायबर पोलिसांच्या ताब्यात

Congress Nana Patole | शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गुन्हेगारीत महाराष्ट्राला युपीच्या पंगतीत बसवले : काँग्रेस

सोसायटीच्या चेअरमन पदावरुन दोन ज्येष्ठांमध्ये जुंपली; परस्परविरोधी गुन्हे दाखल

Shivsena UBT | अदानी आणि सरकारला शिवसेना विचारणार जाब, १६ डिसेंबरला मुंबईत मोर्चा

Pune Bhidewada Smarak | पुणे महापालिकेने अवघ्या चोवीस तासात ऐतिहासिक भिडे वाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुर्ण केली; मध्यरात्री धोकादायक वाडा पाडल्यानंतर आजही सर्वोच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना चपराक