Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून तरुणाचा खून; प्रचंड खळबळ

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भरदिवसा घडलेल्या गोळीबाराच्या (Firing In Pimpri-Pune) घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहर हादरुन गेले आहे. रहदारी असलेल्या रस्त्यावर एका तरुणाचा गोळी झाडून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.23) सायंकाळी पाचच्या सुमारास औंध- रावेत बीआरटीएस मार्गावर (Aundh-Ravet BRTS Route) असलेल्या रक्षक चौकात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकाच मोटारीतून निघालेल्या व्यक्तींमध्ये आपसात झालेल्या वादातून सागर शिंदे (Sagar Shinde) याचा गोळ्या झाडून खून केला. खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह (PCPC Police) पोलिसांचा फोजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत सागर शिंदे मोटारीतून त्याच्या काही साथीदारांसबोत जगताप डेरी च्या (Jagtap Dairy) दिशेने जात होता. दरम्यान, चालत्या गाडीमध्येच सांगवी पुलावर त्यांच्यात वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने काही वाहनांना धडक बसली. गाडी तशीच पुढे जाऊन रक्षक चौकात पंक्चर झाली. त्यानंतर गाडीतून सागर शिंदे हा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा धावत सुटला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

सागर जीव वाचवण्यासाठी पळत असताना आरोपींनी त्याला पाठीत गोळी झाडली. हा फिल्मी स्टाईल थरात भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडला. सागर शिंदे हा गोळी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडला. या घटनेनंतर आरोपींनी बीआरटी रस्ता ओलांडून चौकात जाऊन एका दुचाकीस्वाराला अडवून त्याची दुचाकी घेऊन पळून गेले. सांगवी पोलीस ठाण्यातील (Sangvi Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांचा शोध घेत आहेत.

घटनास्थळी पिस्तुलातून झाडण्यात आलेल्या गोळ्यांच्या दोन पुंगळ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे सागर शिंदे याच्यावर गाडीत देखील गोळी झाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. सागर शिंदे याच्यावर 2013 मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) खुनाचा गुन्हा दाखल आहे. याच वादातून त्याचा खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 3 सराईत गुन्हेगार तडीपार

बनावट कागदपत्रांच्या आधारे सारस्वत बँकेची 27 लाखांची फसवणूक, बिल्डरसह चार जणांविरुद्ध FIR, एकाला अटक

सुरक्षारक्षकांना मारहाण करुन किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, 7 ते 8 जणांवर FIR

ACB Trap News | 95 हजारांची लाच घेताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक,
शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज; नेटेट टॉपने वेधले सर्वांचे लक्ष

विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA