Pune Pimpri Chinchwad Crime News | कोयत्याने सपासप वार करून सूरज काळभोरचा खून, परिसरात प्रचंड खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | मावळ (Murder In Maval) तालुक्यातील गहुंजे (Gahunje) येथे युवकाचा कोयत्याने (Koyta) सपासप वार करून खून (Murder In Pune) करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

सूरज काळभोर (Suraj Kalbhor Murder Case) असे खून झालेल्याचे नाव आहे. सूरज हे गहुंजे येथे त्यांच्या सासरवाडीमध्ये गेले होते. संतोष बोडके यांच्या मुलीशी सूरज यांचा सुमारे दीड महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर ते सासरवाडीत गेले होते. रविवारी सकाळी ते शेतात फिरायला गेले. तीन-चार मारेकर्‍यांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. सूरज काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडले.

घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सूरज यांचा खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सदरील घटना ही लूटमार करण्याच्या उद्देशाने झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस (Pimpri Chinchwad Police) करीत आहेत.
सूरज काळभोर हे आकुर्डी स्टार हॉस्पिटल (Star Hospital in Akurdi) मागे राहायला होते.
त्यांची आई महानगरपालिकेच्या दवाखान्यात (PCMC Hospital) कामाला आहे त
र ते पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये (Pimpri Chinchwad Polytechnic College) नोकरी करीत होते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

Advt.

Web Title :  Pune Pimpri Chinchwad Crime News | Suraj Kalbhor Murder By Koyta Maval Gahunje Police Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा