Pune Pimpri Chinchwad Crime News | इंजिनियर पतीच्या त्रासाला कंटाळून शिक्षक पत्नीने उचललं टोकाचं पाऊल, पिंपरी-चिंचवड परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | इंजिनियर पतीच्या त्रासाला वैतागून शिक्षक असलेल्या पत्नीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide In Pune) केल्याचा प्रकार घडला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षिकेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार भोईरवाडी, माणगाव येथे गुरुवारी (दि.14) रात्री पावणे बाराच्या सुमारास घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)
पुजा कुमारी (वय-28) असे आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी रामधनी प्रसाद (वय-62 रा. झारखंड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश कुमार (रा. भोईरवाडी, माणगाव) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामधनी यांची मुलगी पुजा कुमारी ही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. तिचा पती प्रकाश कुमार हा इंजिनियर असून तो आयटी कंपनीत नोकरी करतो. (Pune Pimpri Chinchwad Crime News )
पुजा हिला नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र पती प्रकाश याने तिला जाणीवपूर्क नोकरी सोडण्यास भाग पाडले. पुजा नोकरी करत असताना प्रकाश तिला नोकरीच्या वेळेत घरातील कामे सांगत होता. तिला कामात व्यस्त ठेवून नोकरीवर जाण्यास अडवणूक करत होता. तिला मानसिक त्रास देऊन घालून पाडून तिच्या पगारावरुन अपमानीत करत होता.
पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घराच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पुजाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पुजा कुमारी ही पती प्रकाश कुमार याच्या त्रासाला वैतागली होती. प्रकाश कुमार याने तिला आत्महत्या करण्यास
भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत