Pune Pimpri Chinchwad Crime News | वसुली अधिकार्‍यानेच घातला फायनान्स कंपनीला १० लाखांना गंडा; वसुलीच्या बनावट पावत्या बनवून केला अपहार

पुणे : फायनान्स कंपनीतील वसुली अधिकार्‍याने कर्जदारांना व कंपनीच्या मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर फोन पे मधून ऑनलाईन ट्रान्झेशन सक्सेस झाल्याची बनावट पावती बनवून कंपनीला १० लाख २१ हजार रुपयांना गंडा (Cheating Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत चेतन शिवाजी तापकीर (वय ३२, रा. थेरगाव) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मंदार पांडुरंग फुलसुंदर (रा. आनंदवाडी, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महिंद्रा अँड महिद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस (Mahindra & Mahidra Financial Services) या कंपनीत स्मार्ट ब्रॅच मॅनेजर आहेत. कंपनीच्या नारायणराव येथे उपशाखा आहे. मंदार फुलसुंदर यास नारायणगाव येथील शाखेत १४ ऑगस्ट २०२३ मध्ये नोकरी देण्यात आली. कंपनीकडून नविन वाहन खरेदी करणार्‍या कर्जदारांना त्यांच्या गरजेप्रमाणे कर्जाची प्रोसेस करुन त्यांचे सर्व कागदपत्रे हे कंपनीच्या नावे असलेल्या वन अ‍ॅपद्वारे ऑनलाईन पाठविणे व कर्ज वितरित झालेल्या प्रत्येक महिन्याचे थकित कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते वसुल करुन ते कंपनीच्या खात्यावर भरणा करण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले होते. कंपनीचे पैसे कोणत्याही प्रसंगी स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यावर घेता योर नाही व ती घेऊ नका, असे मंदार फुलसुंदर याला सांगितले होते. मंदार हा १४ ऑगस्ट ते डिसेबर २०२३ पर्यंत कंपनीच्या नारायणगाव शाखेत वाहन तारण कर्ज मध्ये कर्ज वसुली अधिकारी म्हणून कार्यरत होता.

फिर्यादी यांनी एका कर्जदाराला कर्ज हप्ते कंपनीत भरणा करण्याबाबत फोन केला असता या कर्जदाराने आपण दरमहा कर्जाचे हप्ते मंदार फुलसुंदर याच्याकडे जमा केल्याचे सांगितले. तेव्हा संशय आल्यावर फिर्यादी यांनी नारायणगाव शाखेतील कर्जदारांच्या खात्याची तपासणी केली. त्यात मंदार फुलसुंदर याने ३२ कर्जदारांचे १० लाख २१ हजार ११० रुपये स्वत:च्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये फोन पेद्वारे घेतले. त्या रक्कमेची मोबाईलमधील फोन पेमधून ऑनलाईन ट्रान्झेशन सक्सेस झाल्याचे बनावट पावती बनवून ती कर्जदारास तसेच महिंद्रा फायनान्स कंपनीस मोबाईल अ‍ॅपद्वारे पाठविली. हा प्रकार उघड झाल्यावर कंपनीच्या वतीने तक्रार देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक जगदेवअप्पा पाटील तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

वानवडी: खंडणीसाठी भंगार विक्रेत्याचे अपहरण

बहिणीची छेड काढल्याने सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याचे उघड; कॅम्पातील घटनेमध्ये तिघांना अटक