Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन तिघांवर कोयत्याने वार, हवेत कोयते फिरवून कोयता गँगची परिसरात दहशत; भोसरी मधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातून टोळक्याने तिघांवर कोयत्याने (Koyta Gang) वार केले. तसेच हवेत कोयते फिरवरून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime News) सोमवारी (दि.30) भोसरी येथील चक्रपाणी वसाहत येथे घडला.

 

याबाबत जैन जमशेद नदाफ Jain Jamshed Nadaf (वय-18 रा. चक्रपाणी वसाहत) याने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) मंगळवारी (दि.31जानेवारी) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निखिल पवळे, साहिल मनोवर यांच्यासह इतर चार जणांवर आयपीसी 307, 326, 324, 504, 506, 141, 143, 147, 148, 149, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट (Criminal Law Amendment), आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करुन पवळे आणि मनोवर यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे वडील जमशेद नदाफ आणि निखिल पवळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. याचा राग मनात धरून आरोपी सोमवारी रात्री हातात कोयते, लाकडी बांबू घेऊन दुचाकीवरुन चक्रपाणी वसाहत येथे आले. आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली.

यानंतर आरोपी हे फिर्यादी राहात असलेल्या घरासमोर आले.
त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
निखील पवळे याने जमशेद नदाफ यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात कोयत्याने वार केला.
त्यावेळी फिर्यादी यांची बहिण वडिलांना सोडवण्यासाठी आली असता साहील मनोवार याने तिच्यावर कोयत्याने वार केले
तर त्याच्या साथीदाराने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
त्याचवेळी फिर्यादी यांचा भाऊ इर्शाद नदाफ याने आरोपींना प्रतिकार केला
असता निखिल पवळे याने त्याच्यावरही कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.
तर इतर आरोपींनी फिर्यादी यांच्या आईला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवारी (PSI Bhawari) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Three people were stabbed with koya for a minor reason, Koya Gang terrorized the area by swinging koya in the air; Incident in Bhosari

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Buldhana ACB Trap | साखरेच्या पोत्यासह मागितली होती ४ लाखांची लाच; १ लाखांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

Pune Solapur Highway Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्यासह 4 जण जागीच ठार, 17 जखमी

Maharashtra Politics | अजित पवारांचा कट्टर समर्थक आमदार एकनाथ शिंदेच्या गळाला? गाडीतून केला प्रवास; राजकीय चर्चांना उधाण