ADV

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांकडून वाहनांची तोडफोड, तोडफोड करताना बनवले रिल्स (Video)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड (Wakad) परिसरात तीन अल्पवयीन मुलांनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. आरोपींनी तोडफोड करताना रिल्स बनवल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलांनी कोयत्याने पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठं नुकसान केल. ही घटना मध्यरात्री थेरगाव परिसरात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवण्याचे प्रकार शहरात वारंवार घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा जणांनी शहरातील गजबजलेल्या चार ठिकाणी गोळीबार करुन शहरात दहशत निर्माण केली होती. ही घटना ताजी असतानाच वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. मोबाईलवर रिल्स बनवत वाहनांची तोडफोड करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अज्ञात तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव भागातील एकता कॉलनीत रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. एक मुलगा कोयत्याने वाहनांच्या काचा फोडत आहे. तर त्याचा दुसरा साथीदार मोबाईलमध्ये रिल्स बनवत आहे. परिसरात दहशत पसरवण्यासाठी सोशल मीडियावर रिल्स बनवले आहे. आरोपींनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली.

हा प्रकार समजाच वाकड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर त्याचा तिसरा साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र, आता पुन्हा तोडफोडीनं डोकं वर काढल्याने सामान्य नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cashback On Gas Cylinder Booking | LPG सिलेंडरच्या बुकिंगवर मिळेल 10 टक्के कॅशबॅक, केवळ घ्यावे लागेल हे क्रेडिट कार्ड

Chandrakant Patil | ‘मी पालकमंत्री असताना अशाप्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत’, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा रोख कोणाकडे?

Jayant Patil On Pune Drug Case | पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’; सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याची जयंत पाटलांची टीका

L3 – Liquid Leisure Lounge | फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात 7 जण अटकेत; पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन