Pune Pimpri Chinchwad Crime News | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वाकड पोलिसांकडून अटक, 2 पिस्टल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (PCPC Police) एका सराईत गुन्हेगाराला अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि.5) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास डांगे चौकात करण्यात आली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

विशाल उर्फ रावण सिद्धु बनसोडे (वय-25 रा. लमाण वस्ती, खडकवासला, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरी यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर आर्म अॅक्ट (Arms Act) व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

वाकड पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, पुणे शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्टल घेऊन
डांगे चौकात कामानिमित्त येणार आहे. पथकाने डांगे चौकात जाऊन सापळा रचला. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार
एकजण तिथे आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे असलेल्या बॅगची अंगझडती घेतली असता दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी आरोपीकडून 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण (PSI Chavan) करीत आहेत. आरोपीवर यापूर्वी हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे
(Joint CP Dr. Sanjay Shinde), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (Addl CP Vasant Pardeshi),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 काकासाहेब डोळे (DCP Kakasaheb Dole), सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे
(ACP Dr. Vishal Hire) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड
(Senior PI Ganesh Jawadwad), पोलीस निरीक्षक गुन्हे विठ्ठल साळुंखे (PI Vitthal Salunkhe), सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील (API Santosh Patil), पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण (PSI Sachin Chavan), सहायक पोलीस फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे,
पोलीस अंमलदार संदीप गवारी, वंतु गिरे, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण,
अतिक शेख, प्रशांत गिलबीले, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कौंतेय खराडे, विनायक घारगे,
रमेश खेडकर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाची 7 लाखांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून आरोपीला अटक

गैरसमजातून 10 किलो वजनाची प्लेट मारली डोक्यात, तरुण गंभीर जखमी; धनकवडी येथील जिममधील घटना

Pune Crime News | मनसे पदाधिकाऱ्याकडे खंडणीची मागणी, दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; धायरीतील प्रकार