Pune Pimpri Chinchwad Crime News | वानवडी: खंडणीसाठी भंगार विक्रेत्याचे अपहरण

पुणे : भंगार घेण्यासाठी धुळे येथे जात असलेल्या एका ज्येष्ठ व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping Case) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका ३८ वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३३/२४) दिली आहे. हा प्रकार महंमदवाडी रोडवरील एका सोसायटी येथून १३ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता घडला. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या ७४ वर्षांच्या वडिलांचा क्रॅपचा व्यवसाय आहे. ते क्रॅप घेण्यासाठी धुळे येथे जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर फिर्यादींच्या बहिणीला त्यांचा फोन आला. त्यावेळी ते रडत रडत म्हणाले की, मला २० हजार रुपयांची तात्काळ गरज आहे. त्यावेळी बहिणीने सध्या माझ्याकडे २० हजार रुपये नाहीत, असे सांगितले. वडिल का रडत आहे, याबाबत तिला शंका आल्याने तिने पुन्हा वडिलांना कॉल करुन तुम्ही का रडत आहे, असे विचारले असता अचानक वडिलांच्या हातातून कोणी तरी मोबाईल हिसकावला व त्याने मी किडनॅपर बोलत आहे, तुझ्या वडिलांना आम्ही किडनॅप केले असून तात्काळ २० हजार रुपये त्यांचे अकाऊंटवर पाठव. नाही तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असे बोलला. त्यावेळी फिर्यादीचे वडिल गुजर साहेब उसके पास पैसा नही है, असे बोलताना त्यांना ऐकायला आले. त्यानंतर फोन कट झाला. वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत़ पोलीस उपनिरीक्षक अजय शिंदे तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बहिणीची छेड काढल्याने सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याचे उघड; कॅम्पातील घटनेमध्ये तिघांना अटक

अल्पवयीन मुलीला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या तरुणाला अटक