Pune Pimpri Chinchwad Crime News | वाइन शॉपमध्ये चोरी, रोख रक्कम, दारुचे बॉक्स लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे शहरातील विमानतळ आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वॉईन शॉपचे (Wine Shop) शटर उचकटून चोरट्यांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये रोख रक्कम आणि दारुच्या बाटल्यांचे बॉक्स चोरट्यांनी चोरुन नेले. हा बुधवारी (दि.27) रात्री घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा (Pune Police) दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीतील केशवनगर येथील विरांश वाईन्स शॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील कॅश काउंटरच्या ड्रॉव्हरमधून 4 लाख 19 हजार 500 रुपयांची रोख रक्कम आणि 41 हजार रुपये किमतीचे दारुच्या बॉटलचे बॉक्स चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी सुरेश कचरुलाल देवतवाल (वय-56 रा. मांजरी बु.) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री साडे दहा ते गुरुवारी सकाळी आठ या कालावधीत घडला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जोरे (API Jore) करीत आहेत. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

दुसरी घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत घडली आहे. याबाबत अभिनेश विजय अगरवाल (वय-38 रा. विठ्ठल नगर, खराडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे विमाननगर येथे विजय वॉईन शॉप आहे. बुधवारी रात्री साडे दहा वाजता दुकान बंद करण्यात आले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली 96 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Health Tips – Reheating Food | ‘हे’ 5 पदार्थ पुन्हा गरम करण्याची करू नका चूक, शरीर होईल अशक्त…

पिस्टल बाळगणाऱ्या एकाला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक

मध्यरात्री तरुणीच्या घरी जाऊन विनयभंग, बालाजीनगर परिसरातील घटना

Nashik Crime News | पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या चोरट्याला जालन्यातून अटक, नाशिक गुन्हे शाखेची कारवाई

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाम्पत्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, खडकी परिसरातील घटना