Pune Pimpri Chinchwad Crime News | केस विंचरण्यावरुन नणंद-सासूचे टोमणे, विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; सांगवी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | केस विंचरण्यावरुन आणि सततच्या टोमण्याला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केली (Committed Suicide). याप्रकरणी सासू आणि दोन नणंदांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. हा प्रकार रविवारी (दि.28) रात्री पावणे आठच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडला.(Pune Pimpri Chinchwad Crime News)

शशिकला प्रदीप जाधव (वय-28) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शशिकला यांच्या बहिणीने सोमवारी (दि.29) सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध आयपीसी 306, 498(अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. शशिकला यांचे पती दिव्यांग असून शशिकला या महापालिकेत (PCMC) कंत्राटी काम करत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकला यांचा विवाह पंधरा वर्षापूर्वी झाला असून त्यांना 13 वर्षाचा एक मुलगा आहे. त्या महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करत होत्या. त्यांचे पती दिव्यांग असल्याने घरची सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, सासू आणि दोन नणंदा शशिकला यांना लहान-मोठ्या आणि किरकोळ कराणावरुन शारीरिक आणि मानसिक छळ करत होत्या.

तसेच कपडे घालण्याच्या पद्धतीवरुन, केस विंचरण्यावरुन सतत टोमणे मारत होत्या. शिवीगाळ करत होत्या.
सततच्या त्रासाला कंटाळून शशिकला हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Advt.

Web Title : Pune Pimpri Chinchwad Crime News | woman commits suicide by hanging herself over taunting by mother in law

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Congress Mohan Joshi On PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 वर्षात पुण्याला काय दिले? उद्घाटाने, जाहिराती व भाषणे ! अंमलबजावणी शून्य – मोहन जोशी

Shasan Aaplya Dari | ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे जिल्हाभरात एकाचवेळी आयोजन; एका दिवसात 1 लाख 81 हजार नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ

ACB Trap News | घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी 13 हजार रुपये लाच घेताना कवठेमहांकाळ पंचायत समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात