Pune Pimpri Chinchwad Crime News | महिलेचा पाठलाग करुन विनयभंग, एकाला अटक; खराडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विवाहित महिलेचा पाठलाग करुन तिला मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी देऊन गैरवर्तन (Molestation Case) केले. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार 18 जानेवारी ते 20 जानेवारी तसेच मागिल चार महिन्यांपासून खराडी येथील झेन्सार ग्राऊंड, रिलायन्स चौक आणि एका शाळेजवळ घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत वडगाव शेरी येथे राहणाऱ्या 33 वर्षीय विवाहित महिलेने रविवारी (दि.21) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मोहम्मद सगीर मोहम्मद हुसेन सय्यद (वय-40 रा. गुरुदत्त हौसिंग सोसायटी, तुकाराम नगर, खराडी, पुणे) याच्यावर आयपीसी 354ड नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात आसताना आरोपीने त्यांचा चोरून पाठलाग केला. आरोपी मागील चार महिन्यांपासून महिलेचा पाठलाग करत आहे. तसेच त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत होता. शनिवारी फिर्यादी महिला मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. तसेच मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी फिर्यादी यांच्या हातात देऊन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | घरात घुसून दमदाटी करुन मारहाण, मेहुण्यासह चार जणांवर FIR; वाकड परिसरातील घटना

Pune News | मार्केटयार्ड परिसरात आगीत भस्मसात झालेल्या घरांच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे फाऊंडेशनकडून तात्काळ मदत