Pune Pimpri Chinchwad Crime News | खराडीतील ‘मॅजेस्टिक मारबेला’ साईटच्या दहाव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू, ठेकेदारावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | खराडी येथील मॅजेस्टिक मारबेला या गृहप्रकल्पाच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावर सेंटरींगचे काम करणाऱ्या 31 वर्षीय कामगाराचा खाली पडून मृत्यू झाला होता. ही घटना 21 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी दीड वर्षानंतर ठेकेदारावर चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

बिश्वनाथ खुदीराम बिश्वास (वय-31 रा. चौधरी वस्ती, खराडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदार फहिम उस्मान शेख (वय-33 रा. संजय पार्क, लोहगाव), सब ठेकेदार दिपन देवास समाजदार (वय-36 रा. वाघोली) यांच्यावर आयपीसी 304(अ) 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत बिश्वनाथ याचा भाऊ अभिजीत खुदीराम बिश्वास (वय-32 रा. चौधरी वस्ती, मॅजेस्टिक लेबर कॅम्प, खराडी) यांनी सोमवारी (दि.15) चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील स.नं. 41 ए चौधरी वस्ती येथे मॅजेस्टिक मारबेला या गृहप्रकल्पाचे काम सुरु होते. 21 सप्टेंबर 2022 रोजी बिश्वनाथ हा सत्तो सरदार, सुशांत भौमिक असे सर्वजण मिळून डी विंग इमारतीमधील दहाव्या मजल्यावर काम करत होते. सर्व कामगार किचन रुम मधील सेंटरिंग खोलण्याचे काम असताना बिश्वनाथ याचा तोला गेला आणि तो डक्टमध्ये पडला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने फिर्यादी यांच्या भावाचा मृत्यू झाला.

कामगार दहाव्या मजल्यावर काम करत असताना डी विंग मधील 9, 7 आणि 5 व्या मजल्यावर लावलेले सेफ्टी नेट
निकृष्ट दर्जाचे असल्याने बिश्वनाथ खाली पहिल्या मजल्यावर पडला.
बांधकाम साईटवर कमागारांच्या सुरक्षेततेची साधने व उपाययोजना पुरवणे गरजेचे असताना ती न पुरवता निष्काळजीपणा केल्याने बिश्वनाथ याचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूला ठेकेदार जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अभिजीत बिश्वास यांनी तक्रार देताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | भरधाव बसची दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू तर दोन पादचारी जखमी; कात्रज परिसरातील घटना

अमावस्या, पोर्णिमेला देवाला अंडी, सिगारेट, दारुचा नैवैद्य; मुलासाठी सुनेचा छळ, जादुटोणा कायद्याखाली पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

‘तू दादा झालास का’ म्हणत बिअरच्या बाटल्यांनी मारहाण, एकाला अटक; कर्वेनगर येथील घटना

इंन्स्टाग्रामवर ओळख करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेक्कन परिसरातील घटना

Pune Police Inspector Transfer | पुणे शहरातील 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे शहर वंचित बहुजन आघाडी कार्यकारी अध्यक्षावर स्टेशन परीसरात हल्ला