Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दिल्ली विमानतळावर आलेले गिफ्ट सोडवण्याच्या बहाण्याने 23 लाखांची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीच्या कामानित्ताने ओळख झाल्यानंतर गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. दिल्ली एअरपोर्ट कार्गो डिपार्टमेंटला कुरीअर आल्याचे सांगून वेगवेगळी कारणे देऊन 23 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 11 नोव्हेंबर 2023 ते 30 डिसेंबर 2023 या कालावधीत बावधन, पुणे येथे घडला. (Cheating Fraud Case)

याबाबत केदार चंद्रशेखर मोहिरे (वय 33, रा. बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डॉ. प्रीटी जॉन्सन, मिस्टर पाल मार्क, मिसेस लक्ष्मी भाटीया, अनुप कुमार, अभिजित मोंडल, हरून रशीद यांच्या विरोधात आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट 66(सी), 66(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे फुरसुंगी येथील आय.बी.एम कंपनीत काम करतात. कंपनीत अप्लिकेशन सपोर्टचे काम करत असताना कंपनीच्या क्लायन्ट साईटवरुन कामाच्या संदर्भात त्यांची डॉ. प्रिटी जॉन्सन हिच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर तिने फिर्यादी यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फिर्यादी यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक घेतला. तुम्हा गिफ्ट पाठवत असल्याचे महिलेने सांगितले.

महिलेकडे गिफ्ट पाठवण्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता तिने सांगितले ‘मला इंडियामध्ये ह़स्पिटल प्रोजेक्ट सुरू करायचा आहे. त्यासाठी मला तुझी मदत पाहिजे’. त्यानंतर आरोपींनी संगनमत करुन 22 नोव्हेंबर 2023 रोजी फिर्यादी यांना तुमचे दिल्ली एअर पोर्ट कार्गो डिपार्टमेंटला कुरीयर आल्याचे सांगितले. तसेच कस्टम क्लिअरनस, मनी लॉड्रींग क्लिअरन्स अशी वेगवेगळी कारणे सांगून फिर्यादी यांच्याकडून फोन पे व बँक खात्यात 23 लाख रुपये जमा करुन घेतले. मात्र, त्यानंतर फिर्य़ादी यांना कोणतेही गिफ्ट अथवा दिलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुकाराम शेळके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लष्करी अधिकार्‍यासाठी फ्लॅट भाड्याने घेण्याचा बहाणा करुन सायबर चोरट्यांनी घातला 20 लाखांना गंडा