Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दिघी पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चरोली बुद्रुक गावाकडून लोहगाव येथील खंडोबामाळ कडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी (दि.22) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

राकेश भुराराम चौधरी (वय-27 रा. खंडोबामाळ, लोहगाव, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत राकेश याची बहिण किरण सुरेश चौधरी (वय-32 रा. रुपीनगर, तलवडे, निगडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन श्रेयस संजय पाटील (वय-19 रा. चऱ्होली, पुणे) याच्यावर आयपीसी 279, 304(अ), 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ राकेश चौधरी हा दुचाकीवरुन चऱ्होली बुद्रुक गावाकडून खंडोबा माळ लोहगाव कडे जात होता. राधा चौकातून उजव्या बाजुला वळताना समोरुन भरधाव वेगात कार (एमएच 12 एल व्ही 7295) आली. आरोपीने त्याच्या ताब्यातील कार हयगयीने व निष्काळजीपणे चालवून, वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करुन राकेश चोधरी यांना समोरुन धडक दिली. यामध्ये राकेश रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अज्ञात वाहनाच्या धकडे एकाचा मृत्यू

चाकण : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दत्तात्रय रामचंद्र दौंडकर (वय-55 रा. इनामवस्ती, शेलपिंपळगाव ता. खेड)
यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत विशाल हनुमंत दौंडकर (वय-39 रा शेलपिंपळगाव) यांनी चाकण पोलीस ठाण्यात
फिर्य़ाद दिली आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.23) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील
भिमा-भामा नदीच्या पुलावर झाला. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Cop Suspended | पुणे : पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Sharad Pawar | ”राज्यात सध्या अडचणी वाढतील अशी स्थिती”, शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता