Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : किरकोळ कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | घराजवळ राहणारी मुलीगी व तिची मावस बहिण मित्रांसोबत गप्पा मारत बसली असताना त्यांना हटकलच्या कारणावरुन दोन तरुणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.26) रात्री दीडच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील तानाजी शिवले चाळीसमोर घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी (Chinchwad Police Station) दोघांना अटक केली आहे.

आकाश अरुण लोकरे (वय-21) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आकाशचे वडील अरुण काशिनाथ लोकरे (वय-53 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अजय जालिंदरसिंग टाक (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अविनाश सिताराम गायकवाड (रा. वाकड, पुणे) यांच्यावर आयपीसी 307, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराजवळ राहणारी मुलगी तिच्या घरात मावस बहिण व मित्र आरोपी यांच्यासोबत गप्पा मारत बसली होती. त्यावेळी त्यांचा मुलगा आकाश कामावरुन घरी येत होत. त्याने शेजारी राहणाऱ्या मुलीच्या मावस बहिणाला तु या पोरांसोबत दारु पित आहेस का, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलासोबत वाद घातला. त्यानंतर दोघांनी आकाश याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झिंझुर्डे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chakan Murder Case | चाकणमध्ये अल्पवयीन मित्राचा खून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन अल्पवयीन ताब्यात

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका