Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक, मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पिंपरी पोलिसांच्या (Pimpri Police) पथकाने अटक केली आहे. अटक केलेल्या तरुणाकडून 70 हजार 500 रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चिंचवड येथील केएसबी चौकातील (KBC Chowk) आयुक्त बंगल्याकडे जाणाऱ्या रोडवर सोमवारी (दि.26) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास केली. (Arrest In Ganja Case)

याबाबत पोलीस हवालदार शांताराम पांडुरंग हांडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर किशोर सुनील राक्षे (वय-28 सध्या रा. विजयनगर, सिडको मुळ रा. राहूलनगर, रावळगाव, ता. मालेगाव) याच्यावर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना केएसबी चौकातील आयुक्त बंगल्याकडे जाणाऱ्या रोडलगत असलेल्या फुटपाथवर अंधारात एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रॅम गांजा, मोबाईल असा एकूण 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेटे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील दोन अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Chakan Murder Case | चाकणमध्ये अल्पवयीन मित्राचा खून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; दोन अल्पवयीन ताब्यात

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका