Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : पाण्याच्या टँकरचे चाक डोक्यावरुन गेल्याने युवकाचा मृत्यू, सांगवी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकरची धडक दुचाकीला बसली. यामध्ये टँकरचे मागील चाक डोक्यावरुन गेल्याने दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पिंपळे सैदागर (Pimple Saudagar) येथील कुणाल आयकॉन रोडवर बुधवारी (दि.21) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)

अमोल प्रकाश काकडे (वय-38 रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार अमोल रेणदेव मोराळे (वय-39) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन एमएच 45 1584 टँकर चालकावर आयपीसी 279, 304(अ) सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल काकडे हे त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच 14 डि.के. 7300) वरुन जात होते.
त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकर चालकाने त्याच्या ताब्यातील गाडी बेदरकारपणे, निष्काळजीपणे
हयगयीने चालवून काकडे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील काकडे गाडीवरून रोडवर खाली पडल्याने टँकरचे चाक डोक्यावरून गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्तस्त्राव होऊन अमोल हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी चालक टँकर घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MP Raksha Khadse | नाथाभाऊंच्या भाजपा घरवापसीबाबत रक्षा खडसेंचे सूचक वक्तव्य, ”बरेच लोकांचीही इच्छा…”

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, वाकड परिसरातील घटना; तिघांना अटक

Lok Sabha Election 2024 | पिंपरी : जास्त बुथ संख्या असलेल्या मतदान केंद्रांची पोलीस आयुक्तांकडून पाहणी

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil | ”…तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?