Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : बेपत्ता आठ वर्षीय मुलाचा आढळला मृतदेह, लैंगिक अत्याचार करुन खून; आरोपीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | आठ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करुन खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) परराज्यातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी (दि. 24) सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले होते. पुण्याच्या पाषाण परिसरात नेऊन त्याच्यावर अत्याचार करून गळा दाबून खून केला. हा प्रकार रविवारी (दि.25) उघडकीस आला. (Pune Pimpri Chinchwad Crime)

सलेमान राधेश्याम बरडे (वय 8, रा. पिंकसिटी रोड, वाकड) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी राधेशाम रायसिंग बरडे (वय-33 रा. रोहित कलाटे चाळ, वाकड मुळ रा. मेणीमाता, ता.जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. तर पवन जागेश्वरप्रसाद पांडे (वय-28 रा. बावधन, पुणे मुळ रा. नागरगाव, थाना मानिकपुर, जि. चित्रकुट, उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 363, 302 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा व आरोपी यांची तीन दिवसांपूर्वी ओळख झाली होती.
पांडे हा रसवंती गृहात काम करत होता. शनिवारी सायंकाळी रसवंती गृहासमोर काही मुले खेळत होती.
यात फिर्यादी यांचा आठ वर्षाचा मुलगा देखील होता. पांडे याने फिर्यादी यांच्या मुलासोबत जवळीक साधली.
तो मुलांना रस प्यायला देत असल्याने दोघांमध्ये ओळख वाढली.
याचा गैरफायदा घेऊन आरोपीने शनिवारी फिर्यादी यांच्या मुलाचे अपरहण कले.

दरम्यान, फिर्यादी यांनी वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी घटनेचे गांर्भीय ओळखून मुलाचा शोध सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीला
ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, मुलाचे अपहरण करुन पुण्याच्या पाषाण परिसरातील
मुंबई-बेंगलोर हायवेवरील सर्व्हिस रोड लगत नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अत्याचार करून गळा दाबून खून केल्याची
कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mundhwa Police | घराची वाट चुकलेल्या ज्येष्ठ नागरिकाची मुंढवा पोलिसांनी घडवली कुटूंबियांची भेट

पुणे : जुन्या वादातून अल्पवयीन मुलाला धारदार हत्याराने मारहाण, चार जणांवर FIR

Pune Murder Suicide Case | पुणे : पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या; खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या ‘पिकॉक बे’ परिसरातील घटना

जेवण वाढताना पती-पत्नीमध्ये वाद, पत्नीकडून पतीवर चाकूने वार; भवानी पेठेतील घटना

Pune Pashan-Sus Road Accident | पाषाण-सूस रोडवर अपघात, संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू