Pune Pimpri Chinchwad Crime | विशेष मोहिमेंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली 253 हत्यारे, 211 आरोपींना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) विशेष मोहीम राबवून सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. 19 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत ही विशेष मोहिम राबवून तब्बल 253 घातक शस्त्रे जप्त करुन 211 गुन्हेगारांना अटक (Pune Pimpri Chinchwad Crime) केली आहे.

या विशेष मोहिमेत पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या (Pimpri Chinchwad Commissionerate) अंतर्गत असलेले सर्व पोलीस स्टेशन (Police Station), गुन्हे शाखा (Crime Branch) यांनी ही कारवाई केली. यामध्ये 36 गुन्हे हे केवळ विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळणाऱ्यांविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर इतर गुन्हे तलवार, कोयता यासारखी घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी 150 गुन्हे दाखल करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 211 गुन्हेगारांना अटक (Arrest) करुन तब्बल 48 पिस्टल आणि 205 शस्त्र असे एकूण 253 शस्त्र जप्त केली आहेत.

विशेष मोहिमेंतर्गत चांगली कामगिरी करणाऱ्या आणि पोलिसांना प्रोत्साहन मिळावे यासाठी कामगिरीनुसार
क्रमांक देण्यात आले. पहिल्या क्रमांक दरोडा विरोधी पथक, द्वितीय क्रमांक गुंडा विरोधी पथक,
तृतीय क्रमांक युनीट-4 यांना मिळाला. तर पोलीस स्टेशन स्तरावर महाळुंगे (Mahalunge Police Station),
शिरगाव (Shirgaon Police Station) आणि पिंपरी पोलीस ठाण्यांनी (Pimpri Police Station)
उत्कृष्ट कामगिरी केली.

विशेष मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे
(CP Vinay Kumar Choubey) यांनी प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला.
ही कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title :-  Pune Pimpri Chinchwad Crime | Pimpri Chinchwad police seized 253 weapons under special operation, arrested 211 accused

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime | दररोज एक टक्का जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला लाखोंचा गंडा, भोसरी मधील प्रकार

Neha Malik | नेहा मलिकचा बोल्ड अंदाज; कर्वी फिगर करत वेधले सर्वांचे लक्ष