Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : पोलीस उपनिरीक्षक असल्याची सांगून उकळले पैसे, तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगून तरुणीसोबत ओळख वाढवून तिच्याकडून वेळोवळी पैसे घेतले. तसेच तरुणीला ब्लॅकमेल (Blackmail) करुन आणखी पैशांची व शारीरिक संबंधाची मागणी केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकार 4 जानेवारी 2024 ते 1 मार्च 2024 या कालावधीत वाकड (Wakad) येथे घडला आहे. (Molestation Case)

याबाबत एका तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम राठोड (वय-40 रा. चिंचवड) याच्यावर 354(ड), 384, 385, 170, 506 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम राठोड याने इन्स्टाग्राम आयडीवर (Instagram ID) दुसऱ्याच एका पीएसआयचा फोटो वापरला. त्यावरुन व्हॉट्सअॅप तसेच कॉल करुन फिर्यादी यांच्याशी ओळख केली. त्याने फिर्यादी यांना पीएसआय असल्याचे सांगून लग्न करणार असल्याचे सांगून तरुणीचे फोटो घेतले. फोटो व चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून वेळोवेळी फोन पे द्वारे 8 हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर तरुणीला ब्लॅकमेल करुन आणखी पैशाची मागणी केली. त्यावेळी तरुणीने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर देखील आरोपीने वारंवार तरुणीला फोनवर, व्हॉट्सअपवरुन लग्नाची, शारीरिक संबंधाची व पैशांची मागणी करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lonikand Crime | पुणे : सासरी येण्यास नकार दिल्याने पत्नीवर वार, पतीला अटक

Pramod Nana Bhangire | ‘अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना निधी न आणणाऱ्या विरोधकांनी श्रेय लाटू नये’ ! ‘विकास कामात अडथळा आणल्यास करारा जवाब मिलेगा’ – प्रमोद नाना भानगिरे

Pune Cheating Fraud Case | बनावट सह्यांच्या आधारे भागीदाराकडून सव्वापाच कोटींची फसवणूक ! न्यायालयाने जामीन फेटाळूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा पीडित माणिक बिर्ला यांचा पत्रकार परिषदेत आरोप