Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड, दोन गावठी कट्टे जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | शस्त्राचा धाक दाखवून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे (Nigdi Police). अटक केलेल्या आरोपींकडून दोन गावठी कट्टे (Desi Pistol Seized), रिक्षा आणि मिरचीपूड असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) रात्री साडेआठ वाजता ओटास्कीम येथील स्मशानभूमी जवळ करण्यात आली.

गणेश तुकाराम सांगोळकर (वय 23, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, निगडी), चंद्रकांत अंकुश चव्हाण (वय 36, रा. रुपीनगर, तळवडे), विनोद शिवचरण हिप्परीकर (वय 35, रा. ओटास्कीम, निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर प्रकाश चंद्रकांत धोत्रे (रा. रुपीनगर, तळवडे), पंचू तावडे यांच्या विरोधात आयपीसी 399 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विनायक सुभाष मराठे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम स्मशानभूमी येथे काहीजण रिक्षा जवळ उभे असून ते दरोडा घालण्याच्या
तयारीत आहेत, अशी माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुषंगाने पोलिसांनी परिसरात पाहणी केली.
त्यावेळी पाचजण स्मशानभूमीच्या पाठीमागील बाजूला रिक्षा जवळ उभे असल्याचे दिसले.
पोलिसांनी सापळा लाऊन तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे दोन साथीदार प्रकाश आणि तावडे अंधारात पळून गेले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 2 गावठी कट्टे, मिरचीपूड, रिक्षा असा एकूण 64 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी