Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला पिंपरी पोलिसांकडून अटक, दोन फरार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | एका मंदिरातील दानपेटी मधील पैसे चोरल्यानंतर दुसऱ्या मंदिरातील दानपेटी फोडताना एका चोरट्याला रंगेहाथ पकडले. तर त्याचे इतर दोन साथीदार फरार झाले. हा प्रकार चिंचवड परिसरातील काळभोर नगर (Kalbhor Nagar Pimpri) येथील सुर्योदय कॉम्प्लेक्स येथे गुरुवारी (दि.22) रात्री एकच्या सुमारास घडली.

रोहित राहुल शिंदे (वय-22 रा. खडीमशिन, खंडोबामाळ, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लाला व बाबु (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) हे फरार झाले असून त्यांच्यावर आयपीसी 380, 457, 511, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रदिप गंगाराम शिंदे (वय-58 रा. काळभोर नगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी साई मंदिरातील दानपेटीतील अंदाजे 4 हजार रक्कम तसेच लाकडी पेटीचे कुलुप तोडून 11 हजार 478 रुपये रोख चोरून नेले. तसेच शिव मंदिरातील, स्वामी समर्थ मुर्तीसमोर असलेली दानपेटी दानपेटी फोडून 7 हजार 478 रुपये चोरून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका आरोपीला अटक केली. तर त्याचे दोघे फरार झाले आहेत. पिंपरी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रवासादरम्यान बॅगेतून दागिन्यांची चोरी

भोसरी : चाकण ते मोशी या दरम्यान रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षातील महिला प्रवाशांनी बॅगेतून दागिने चोरून नेले. याबाबत एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यारुन तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान घडला. फिर्यादी महिला चाकण येथून मोशी येथे राहत्या घरी रिक्षाने जात होते. त्यावेळी रिक्षात त्यांच्या शेजारी तीन महिला बसल्या होत्या. त्या महिलांनी फिर्यादी यांची बॅग कापुन बॅगेत ठेवेले एक लाख 30 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Raj Thackeray-Manohar Joshi | मनोहर जोशींच्या निधनानंतर राज ठाकरेंचा शोकसंदेश, ”शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न…”

Maharashtra IAS Transfers | राज्यातील 12 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या ! कविता व्दिवेदी यांची पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी नियुक्ती तर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालकपदी कार्तिकी एन एस यांची नियुक्ती

Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR