Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की, आरोपींचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | खेड न्यायालयाच्या (Khed Court) आदेशानुसार जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या परिरक्षण भूमापक अधिकाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. तसेच तीन महिलांनी स्वत:च्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ (पेट्रोल/डिझेल) ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Suicide Attempt) केल्याची घटना साबळेवाडी येथे मंगळवारी (दि.2) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police) 11 जणांना अटक केली आहे.

याबाबत परिरक्षण भुमापक धनंजय अशोक ठाणेकर (वय-41 रा. नागेश्वर मंदीराजवळ, सोमवार पेठ, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाळासाहेब साबळे, नामदेव बबन साबळे, चांगदेव बबन साबळे, संदीप नामदेव साबळे, चार महिला, भरत भाऊसाहेब साबळे, बाळराजे चांगदेव साबळे, बापू चांगदेव साबळे यांच्यावर आयपीसी 332, 353, 143, 347, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी उपअधीक्षक भुमिअभिलेख कार्यालय खेड येथे परिरक्षण भुमापक म्हणून कार्यरत आहेत. खेड दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या मदतनीस याला घेऊन साबळेवाडी येथील सिद्धेगव्हाण या जमिनीची शासकीय मोजणी करण्यासाठी गेले होते. मोजणी करत असताना आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी मोजणी करण्यास विरोध करुन फिर्यादी यांना निघून जाण्यास सांगितले.

धनंजय ठाणेकर हे आरोपींना समजावून सांगत असताना त्यांनी मोठमोठ्याने आरडा ओरडा करुन शिवीगाळ केली.
तसेच धक्काबुक्की केली.
फिर्य़ादी यांचे मदतनीस विठ्ठल गावंडे यांच्या हातातील जीपीएस मशीन जबरदस्तीने हिसकावून घेत ढकलून दिले.
तसेच दगडाने ठेचून मारुन टाकण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

दरम्यान, तीन महिलांनी प्लॅस्टीकच्या बॉटलमध्ये ज्वलनशिल पदार्थ (पेट्रोल किंवा डिझेल) मागवून घेतले.
ज्वलनशिल पदार्थ अंगावर ओतून घेऊन त्यांनी स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांनी याबाबत चाकण पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सर्व आरोपींना अटक केली आहे.
पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक