पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | शुल्लक कारणावरुन पतीने शिवीगाळ करुन पत्नीला बॅटने बेदम मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी मुलीने थेट शिक्षक बापा विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. हा प्रकार बुधवारी (दि.12) नेवाळे वस्ती, चिखली येथे रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत 19 वर्षीय मुलीने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन खंडु म्हातारदेव खेडकर (वय-48 रा. शाईन सिटी, नेवाळे वस्ती, चिखली) याच्याविरोधात आयपीसी 326, 325. 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खंडु खेडकर हा शिक्षक आहे. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास फिर्यादी यांच्या आईने वडिलांना घरातील किरकोण कारणावरुन हटकले. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांच्या आईला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. यानंतर बेडरुममध्ये ठेवलेली क्रिकेटची लाकडी बॅट आणून तुला आता जिवे मारुन टाकतो अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या आईच्या डोक्यात बॅट मारली. यामध्ये फिर्यादी यांची गंभीर जखमी झाली. तसेच या घटनेत फिर्यादी यांच्या आईच्या हाताचे दोन बोटे फ्रॅक्चर झाले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
शनिवारी, रविवारी पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू