Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime | भरधाव वेगात जाणाऱ्या हायवा ने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.21) पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) चिंबळी फाटा (Chimbli Phata) येथे घडला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) हायवा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अपघातात भास्कर नामदेव खताळ हे जखमी झाले आहेत तर त्यांची पत्नी सुरेखा खताळ यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भास्कर यांचा पुतण्या साईराज रोहिदास खताळ (वय 23 रा.शिवाजीवाडी मोशी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून हायवा ट्रक (एमएच 14 के.ए. 2798) चालक लक्ष्मण किसन ढोकणे याच्यावर आयपीसी 279, 304(अ), 337, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Pimpri Chinchwad Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते भास्कर खताळ व चुलती सुरेख खताळ हे दुचाकीवरुन जात होते. पुणे-नाशिक रोडवरील चिंबळी फाटा येथे आले असता आरोपीने त्याच्या ताब्यातील हायवा गाडी भरधाव वेगाने हयगयीने चालवून फिर्य़ादी यांच्या चुलत्यांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात फिर्यादी यांचे चुलते भास्कर खताळ यांच्या डोक्याला, हाता पायाला मार लागला. तर चुलती सुरेखा खताळ यांच्या डोक्यावरुन हायवा गाडीचे चाक गेले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Sadashiv Peth Crime | एकमेकांकडे पाहून हसण्यावरून दोघांवर चाकूने वार, एम.आय.पी.टी कॉलेजमधील घटना

Baramati Lok Sabha Election 2024 | विजय शिवतारे यांचा बोलविता धनी कोण? अजित पवार समर्थक सावध

Pune Vidyapeeth Crime | राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या कारणावरुन मारहाण, पुणे विद्यापीठातील घटना

Pimpri Traffic Updates | पिंपरी : तुकाराम बीजसोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Lok Sabha | ‘पुणे लोकसभेच्या आखाड्यात हजारो मल्ल ठोकणार शड्डू’ ! मुरलीधर मोहोळांचा घरोघरी जाऊन करणार प्रचार (Video)